घरताज्या घडामोडीपत्राचाळ घोटाळा: Google ला पण माहितीये, नितेश राणेंनी उडवली राऊतांची खिल्ली

पत्राचाळ घोटाळा: Google ला पण माहितीये, नितेश राणेंनी उडवली राऊतांची खिल्ली

Subscribe

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २० जूनपर्यंत या प्रकरणातील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी पत्राचाळ घोटळा प्रकरणी ट्वीट करत संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

नितेश यांनी गुगलवर पत्राचाळ असं टाइप केल्यानंतर संजय राऊतांच्या पत्राचाळ प्रकरणातील संबंधित बातम्या या अनेक वृत्तपत्र आणि माध्यमांनी संपादित केल्या आहेत. त्यांची नावं देखील समोर येत आली आहेत. यावेळी Google ला पण माहिती आहे, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -

या प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जामिनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर १० मे रोजी संजय राऊत हे मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले होते. परंतु आरोपी सारंग आणि राकेश वाधवान हे कोर्टात गैरहजर राहिले होते. त्यामुळे गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप स्पष्ट नाहीये. परंतु पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, नितेश राणेंच्या या ट्वीटनंतर संजय राऊत त्यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ED inquiry : टिल्लूपासून उल्लूपर्यंत सर्वांची वरात निघेल… राष्ट्रवादीची भाजपावर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -