नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका, म्हणाले…

सध्या राजकारण्यांमध्ये एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्यांना भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Nitesh Rane

सध्या राजकारण्यांमध्ये एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्यांना भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यावर नितेश राणे खोचक टीका केली आहे. चपट्या पायाचा संजय राऊत बेळगावात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गेला आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

हेही वाचा – “संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी”, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

बेळगावात एकीकरण समितीच्या विरोधात जाऊन प्रचार करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखे आहे. त्यांच्या या विधानावर हल्लाबोल करत नितेश राणे म्हणाले की, “चपट्या पायाचे संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्यासाठी गेले आहेत. पण जेव्हा ते सामनाच्या आधी लोकप्रभामध्ये होते, तेव्हा त्यांची भूमिका काय होती, हे स्पष्ट करावे. बाळासाहेब ठाकरे यांनी बेळगावातील मराठी माणसांसाठी आंदोलन केले. ज्यावेळी या आंदोलनात अनेक शिवसैनिकांना तुरूंगात टाकण्यात आले, त्यावेळी संजय राऊत कुठे होते, बेळगाव आंदोलनात राऊतांचे योगदान काय,” असे प्रश्न यावेळी नितेश राणे यांच्याकडून उपस्थित करण्यात आले. जर का संजय राऊत त्यांचे जुने दिवस विसरले असतील त्याची मी आठवण करून देतो, लोकप्रभामध्ये असताना जे काही लिखाण केले ते मी वाचून दाखवतो, असेही यावेळी राणे म्हणाले.

संजय राऊत समाजवादी विचारांचे…
लोकप्रभामध्ये असताना संजय राऊत हे हिंदुत्वाविरोधात लिहायचे, असा आरोप निकेश राणे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. राऊत हे खरे समाजवादी विचाराचे आहेत, पण आता ते हिंदुत्व आणि भगव्याबद्दल बोलत आहेत. बेळगाव आंदोलन सुरू असताना ते शिवसेनेत होते, याचा कमीत कमी एक पुरावा त्यांनी द्यावा, असे आव्हान देखील नितेश राणेंकडून देण्यात आले आहे.

पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल बोलावे…
संजय राऊत हे बेळगावात जाऊन मराठी माणसांसाठी मोठ मोठी भाषणे करत आहेत. पण त्यांनी पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल बोलावे, अशी टीका नितेश राणे यांच्याकडून करण्यात आली आहे. पत्राचाळीतील मराठी माणसांबरोबर राऊतांनी काय केले. ती सामान्य घरात राहणारी मराठी माणसं तुमच्या मालकांच्या मुलासारखी ९७ हजारांचा बिल करत नाही. पत्राचाळीतील मराठी माणसाबद्दल बेळदगावात जाऊन बोलावे. नाही तर राऊतांना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे देखील यावेळी नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले.