घरमहाराष्ट्रउदयपूरच का? नितेश राणेंचा मविआ सरकारवर निशाणा

उदयपूरच का? नितेश राणेंचा मविआ सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.

उदयपूरच्या धनमंडी येथील शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल तेली याच्या दुकानात मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे तरुण आले. त्यांनी कन्हैयालाल यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकाने त्यांच्यावर वार केले, तर दुसऱ्याने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयपूर शहरात तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी आंदोलन करून जाळपोळ सुरू केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली. पण मविआ सरकारने तो विषय दाबून टाकला. कुठल्याही धर्माच्या देवीदेवतांवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाहीच, मग हिंदूंना मारून टाकण्याची सूट दिली आहे का?, असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -