अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो, नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

nitesh rane

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीसह भाजप, शिंदे गट आणि मनसे नेते आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट करत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आता भोंग्यातून यांचं खरं प्रेम बाहेर पडलंय. सावरकरांवरती टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा आहे. अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं.

राहुल गांधींनी राऊतांची केली विचारपूस

भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय, असं ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी नेहरुंना वाचलेलं नाही, इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं, एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.


हेही वाचा : ड्रायव्हरच्या मस्तीमुळेच नवले ब्रिजवर भीषण अपघात, चौकशीनंतर धक्कादायक कारण आलं