घरमहाराष्ट्ररझा अकादमीवर बंदी घाला; नीतेश राणे यांची मागणी

रझा अकादमीवर बंदी घाला; नीतेश राणे यांची मागणी

Subscribe

यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देणार

राज्यात काही शहरात झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला असून या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सोमवारी येथे केली.

रझा अकादमीचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली? असे सवालही राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

रझा अकादमीच्या समर्थकांनी त्रिपुरात धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लीम धर्मियांची माथी भडकविली. १२ नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या भित्तिपत्रकातून हिंसाचार घडविण्यासाठी चिथावले गेले. एवढे सगळे घडत असतानाही राज्याच्या पोलिसांनी रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी दिली . या मोर्चात सहभागी झालेल्या मंडळींनी काही कारण नसताना हिंदू धर्मियांवर हल्ले चढविले , पोलिसांवरही दगडफेक केली. मात्र पोलिसांनी हिंसक जमावाला बळाचा वापर करून रोखले नाही. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि महाविकास आघाडीचे काही नेते या हिंसाचाराबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना दोष देत आहेत हे धक्कादायक आहे, असे राणे म्हणाले.

२०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेला हिंसाचार, भिवंडीत या संघटनेच्या जमावाने पोलीस स्थानकावर हल्ला चढवून दोन पोलिसांची केलेली हत्या या घटनांचेही नीतेश राणे यांनी यावेळी स्मरण करून दिले.शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या व्यासपीठावर जाऊन केलेल्या भाषणाची चित्रफीत ऐकवत याबद्दल खोतकर यांना का अटक केली नाही? असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -