घरमहाराष्ट्रVaibhavwadi Nagar Panchayat Election 2022 : वैभववाडीत नितेश राणेंचा एकहाती विजय, देवगड...

Vaibhavwadi Nagar Panchayat Election 2022 : वैभववाडीत नितेश राणेंचा एकहाती विजय, देवगड नगरपंचायत हातातून निसटली

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकींमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. परंतु वैभववाडीत आमदार नितेश राणेंनी एकहाती विजय मिळवला आहे. वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजप ८ जागा तर शिवसेना ५ आणि अपक्ष ३ अशा जागेवर विजयी झाली आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं असून शिवसेनेचा जबर धक्का बसला आहे.

देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेल्या देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरूंग लावला आहे. त्यामुळे नितेश राणेंना मोठा फटका बसला आहे. देवगडमध्ये शिवसेनेने ८ जागा मिळवल्या तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.

- Advertisement -

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव सहा जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर भाजपला पाच जागा मिळवल्या आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला.

राणे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने

दरम्यान, वैभववाडी नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. कुडाळ नगर पंचायतीत शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढण्यात आली.परंतु
या रॅलीला भाजपने विरोध केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राणे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

- Advertisement -

हेही वाचा : Dapoli Nagar Panchayat Election 2022 : दापोली नगरपंचायतीत अनिल परबांची सरशी तर रामदास कदमांना धक्का


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -