घरमहाराष्ट्रNitesh Rane : नितेश राणेंची तब्येत आणखी खालावली, उलट्यांचा त्रास सुरु; आज...

Nitesh Rane : नितेश राणेंची तब्येत आणखी खालावली, उलट्यांचा त्रास सुरु; आज जामिनावर होणार सुनावणी?

Subscribe

संतोष परब हल्ला प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असणारे आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर  आज सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीपूर्वी नितेश राणे यांची तब्येत आणखी खालावली आहे. कालपासून त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नितेश राणे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. ह्रदयरोग तज्ज्ञ नसल्याने नितेश राणेंना कोल्हापूरला हलवण्यात आले होते. मात्र या रुग्णालयात आणल्यापासून नितेश राणे यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणे यांना काल रात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना रात्रीपासून जवळपास तीनवेळा उलट्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मेडिकल टीमने आता नितेश राणेंच्या सर्व मेडिकल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. यावर बुधवारी निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होताना प्रकृतीचा विचार केला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याशिवाय नितेश राणे यांच्या समवेत त्यांचे खाजगी स्वीय सहायक राकेश परब यांच्या देखील नियमित जामीन अर्जावर आज न्यायालय निकाल देणार आहे. राकेश परब यांच्या मोबाईलवरून मुख्य आरोपी सचिन सातपुते यांच्या मोबाईलवर तब्बल 30 पेक्षा जास्त फोन कॉल्स आल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने झाला होता. यावेळी राकेश परब यांच्या मोबाईलचा वापर आमदार नितेश राणे खाजगी कामासाठी करतात तर घटना घडली त्यावेळी देखील सचिन सातपुते आणि राकेश परब यांच्यात झाले संभाषण झाले होते. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह राकेश परब यांना देखील नियमित जामीन मिळतो का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


Karnataka Hijab Row : ‘अल्ला हु अकबर’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -