घरताज्या घडामोडीकुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी?, महापौरांना नितेश राणेंचा सवाल

कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी?, महापौरांना नितेश राणेंचा सवाल

Subscribe

एका पेंग्वीनच्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकिट दर लावून हिरावून घेतले.

मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनची देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १५ कोटींचे टेंडर ३ वर्षांच्या कालावधीसाठी काढलं आहे. या टेंडरवरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पेंग्विनच्या खर्चासाठी अव्वाच्या सव्वा खर्च कशासाठी असा प्रश्न भाजपकडून करण्यात आला आहे. कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यावधींची उधळपट्टी होतेय असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना केला आहे. वाघांची देखभाल महानगरपालिका कर्मचारी करु शकतात तर पेंग्विनसाठी १५ कोटींचा ठेका कुणासाठी? असा प्रश्न नितेश राणेंनी केला आहे. महसूल वाढला म्हणजे आकर्षण वाढले असं भ्रमीत करण्यात येत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून पेंग्विनसाठी १५ कोटींचा ठेका कुणासाठी? असा प्रश्न केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्‍मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्विन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१९८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षामध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षात सात लाख पर्यटकांची संख्या घटली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नितेश राणे यांनी पुढे म्हटलं आहे की, मुळात महसूल वाढला महणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यत या राणीबागेतील प्रवेश शुल्क है ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदीसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे. तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही. एवढंच नाहीं तर शक्‍ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलंत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्वीनची का नाही? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

- Advertisement -

राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करुन जाण्याचे ठिकाण होते. पण एका पेंग्विनच्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकिट दर लावून हिरावून घेतले. इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथिल करताना राणीबागेचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा असे आवाहन नितेश राणेंनी केलं आहे.


हेही वाचा :  मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, सुरक्षेसाठी उभारलं जाणार आता नवं मॉडल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -