घरताज्या घडामोडीmeow meow केल्यावर मालकाला राग का आला? नितेश राणेंचा राऊतांना सवाल

meow meow केल्यावर मालकाला राग का आला? नितेश राणेंचा राऊतांना सवाल

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. खर्गेंनी मोदींना विषारी साप म्हटलं होतं. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून मोदींवर निशाणा साधला. खर्गेंनी मोदींना विषारी साप म्हटल्याचं मी ऐकलं. पण ते नेमकं काय म्हणाले? हे मला माहित नाही. मात्र समजा साप म्हटलं असेल तर गैर काय? कारण महाराष्ट्रात सापाची, नागाची पूजा केली जाते. सापाला देव मानलं जातं. साप हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचं समर्थन करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला होता. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत meow meow केल्यावर तुमच्या मालकाला राग का आला?, असा सवाल उपस्थित करत राऊतांवर टीका केली.

नितेश राणेंचं ट्वीट काय?

- Advertisement -

साप शेतकऱ्याचं प्रतिक आहे. सापाची पूजा केली जात आहे, यावर राग मानू नये. मग meow meow केल्यावर तुमच्या मालकाला राग का आला ? मांजर घरी ठेवल्यावर good luck येतं असे म्हणतात, असं ट्वीट करत नितेश राणेंनी राऊतांसह ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली.

- Advertisement -

२०२१ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून राजकारण तापलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. आदित्य ठाकरे विधानभवनात प्रवेश करत असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपनं आंदोलनं केलं होतं. त्यावेळी नितेश राणे हे विरोधक होते. या आंदोलनादरम्यान भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर राजकारणात आरोप-प्रत्यारोपच्या फैऱ्याही झडल्या.

दरम्यान, या एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना ट्वीटच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे.

PM मोदींबद्दल खर्गेंचे आक्षेपार्ह वक्तव्य

कलबुर्गी येथील जाहीर सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. ‘पंतप्रधान मोदी हे… सारखे आहेत. तुम्ही विचार करू शकता की, ते विष आहे की नाही? जर तुम्ही ते (विष) खाल्ले तर तुम्ही मराल, असं आक्षेपार्ह वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले होतं.


हेही वाचा : PM मोदींबद्दल खर्गेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; भाजपाचा पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -