घरताज्या घडामोडीठाकरेंनी बॅग भरावी आणि निघावं, 'ते' दोन मंत्री आहेत उचलायला.., नितेश राणेंची खोचक टीका

ठाकरेंनी बॅग भरावी आणि निघावं, ‘ते’ दोन मंत्री आहेत उचलायला.., नितेश राणेंची खोचक टीका

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईच्या विकासासंदर्भात आणि शिंदे-फडणवीस सरकारबाबत भाष्य करत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पीएम नरेंद्र मोदींनी मुंबईसाठी ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं गिफ्ट दिलं. मेट्रोसारखा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी आणला. या सर्व गोष्टींचा फायदा मुंबईला होणार आहे. दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच भेटणार, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली बॅग भरून निघून जावं. तुमच्या बॅगा उचलण्यासाठी अनिल परब आणि अनिल देसाई आहेत, अशी खोचक टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या उद्धव ठाकरेंच्या हातात काहीच राहिलं नाहीये. उद्या धनुष्यबाण चिन्हा एकनाथ शिंदेंनाच भेटणार, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाने आपली बॅग पॅक करून निघून जावं. तुमच्या बॅगा उचलण्यासाठी अनिल परब आणि अनिल देसाई आहेत. कारण मुंबई आणि महाराष्ट्रात काही कामचं राहिलं नाही. उद्धव ठाकरेंचं आवडतं शहर लंडन असून, तिथे स्थायिक व्हावं, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल, तर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारचा आदर ठेवावा लागेल. मुंबईला लिहिण्यापूरतच आर्थिक राजधानी हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी ठेवलं होतं. पण, आज मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होतं आहे, असं नितेश राणे म्हणाले.

मोदींनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांची कामं महाविकास आघाडीने केली. त्याचं श्रेय शिंदे-फडणवीस सरकार घेतंय, असा आरोप शिवसेनेने केला. यावर नितेश राणे म्हणाले की, घटनाबाह्य म्हणायचं आणि सरकारच्या सर्व सवलती, सुरक्षा, सामनाच्या पहिल्या पानावर जाहीरात छापून पैसे मिळवायचे. थोडी लाज आणि स्वाभिमान उरला असेल, तर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी जाहीर करावं की, हे सरकार घटनाबाह्य असून, आम्हाला काहीच नको, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबईकरांची गर्दी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -