घरमहाराष्ट्रसचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे?; नितेश राणेंचा सवाल

सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे?; नितेश राणेंचा सवाल

Subscribe

सचिन वाझे प्रकरणात एनआयए चौकशी करत असताना भाजपाकडून आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचे. परमबीर सिंह यांना ते विचारतच नव्हते, असे नितेश राणे म्हणाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच, सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली? असा सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणी एनआयए चौकशी करत असून सचिन वाझे हे सध्या एनआयएच्याच कोठडीत आहेत.

नितेश राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते, असे राणे म्हणाले आहेत.

- Advertisement -

सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायचे, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला आहे. सचिन वाझे वर्षावर का राहायचे? वर्षा कुणाचनिवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी त्यांना कुणी दिली होती? त्यामुळेच सचिन वाझे हा थेट उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

आता फक्त किस्से मोठे!

बुधवारी सकाळी नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमावरून देखील राज्य सरकारवर निशाणा साधला. आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! असं ट्वीट नितेश राणेंनी केलं होतं. भूमिपूजन कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरून नितेश राणेंनी राज्य सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -