Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे, कोकणात म्हात्रेंच्या विजयानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे, कोकणात म्हात्रेंच्या विजयानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यामध्ये पहिला निकाल कोकणातून आला. यावेळी कोकणात भाजपाने विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. यंदा राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजार ८०० मतं मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मतं मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११ हजार ३०० मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. दरम्यान, कोकणात झालेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिक्षकांचा आमदार शिक्षकच असला पाहिजे. हा विचार कोकणातील शिक्षक मतदारांना पटला. त्यांनी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आमदार केलं. सर्व शिक्षक मतदारांचे आभार, असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -

२०१७ मध्ये शेकापचे बाळाराम पाटील यांच्या विरोधात शिवसेनेतून उभे असणाऱ्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा ४ हजार ९५० मतांनी पराभव झाला होता. यंदा मात्र भाजपाच्या माध्यमातून दुप्पट मतांनी विजयश्री खेचून आणण्यात म्हात्रे यांनी यश मिळवले आहे.

- Advertisement -

कोकण शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी ९८ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज नेरुळ येथील आगरी कोळी भवनात मत मोजणी झाली. यंदाच्या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यात पाहायला मिळाली. आज झालेल्या मत मोजणीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजीर ६८३, बाळाराम पाटील १०९९७, धनाजी पाटील १४९०, उस्मान रोहेकर ७५, तुषार भालेराव ९०, रमेश देवरुखकर ३६, राजेश सोनावणे ६३, संतोष डामसे १६ इतकी मतं मिळाली. तर नोटा आणि बाद १६१९ मतं पडली. एकूण ३५ हजार ६९ मतं पडली.


हेही वाचा : कसबा पोटनिवडणुकीबाबत शिंदे गटाची भूमिका काय? दीपक केसरकर म्हणाले…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -