Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार, लूक आऊट सर्क्युलरवरुन नितेश राणेंचा इशारा

आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार, लूक आऊट सर्क्युलरवरुन नितेश राणेंचा इशारा

ठाकरे सरकारचा समज आहे की आम्ही घाबरु, परंतु राणेंना घाबरवणं ठाकरे सरकारला शक्य नाही आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटीसवर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे डीएचएफलचे खातं हे मुंबई ब्रांचमध्ये आहे. पुणे क्राईम ब्रांचने कोणत्या हिशोबाने अधिकार राहतो असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. या नोटीसमुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार असे म्हटलं जात आहे. पण यामुळे आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून नंदकुमार चतुर्वेदी बेपत्ता आहे. त्याचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध? आणि तो का बेपत्ता आहे? असे सवाल करुन वादात नवा पेच निर्माण केला आहे.

पुणे क्राईम ब्रांचने काढलेल्या लूक आऊट नोटीसवर आमदार नितेश राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, लुक आऊट सर्क्युलर म्हणजे त्यांनी एयरपोर्ट अथॉरिटीला इंटिमेट केलं आहे की, नितेश राणे आणि नीलम राणे देश सोडू शकतात हा पहिला मुद्दा आहे. तर दुसरा मुद्दा असा आहे की, हे जे काही सर्क्युलर काढलं आहे ते पुणे क्राईम ब्रांचने काढला आहे. आमचे डीएचएफलचे खातं हे मुंबई ब्रांचमध्ये आहे. पुणे क्राईम ब्रांचने कोणत्या हिशोबाने अधिकार राहतो. ५ महिन्यांपुर्वी आम्ही अधिकृत बँकेला पत्र लिहून आम्हाला लोन सेटल करायचे आहे असे सांगितले आहे. तर मग हे अशा पद्धतीचे पत्र पाठवून उपयोग नाही. या प्रकरणावर आम्ही हायकोर्टात आव्हान देणार असून स्क्वॉश करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारची अडचण वाढणार

- Advertisement -

लुकआऊट नोटीसमुळे राणे कुटुंबीयांची अडचण होणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावर नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, आमची अडचण आहेच नाही. आता मुंबई क्राईम ब्रांचची अडचण होणार आहे. महाविकास आघाडी सरकारची अडचण होणार आहे. आम्ही ५ महिन्यांपुर्वी पत्र लिहून सांगितले आहे त्यामुळे आमची अडचण होणारच नाही.

नंदकुमार चतुर्वेदी का गायब आहे?

ठाकरे सरकारची झोप उडवत आहोत. यामुळे राज्य सरकार कारवाई करतंय, राज्य सरकारच्या नेत्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढतोय नंदकुमार चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांचे काय संबंध ते अजून बाहेर निघणार आहे. नंदकुमार चतुर्वेदी मागील ४ महिन्यांपासून बेपत्ता असून त्याविरोधात लूक आऊट नोटीस काढा, नंदकुमार चतुर्वेदी का गायब आहे? काय संबंध आहे? याची माहिती देणार आहे. अडचणी आमच्या वाढणार आहेत की ठाकरे सरकारच्या वाढणार ? हे कळेल असे विधान नितेश राणेंनी केलं आहे.

- Advertisement -

ठाकरे सरकारचा समज आहे की आम्ही घाबरु, परंतु राणेंना घाबरवणं ठाकरे सरकारला शक्य नाही आहे. आम्हाला जर अशा पद्धतीने कारवाईत अडकवत असतील तर आम्ही पण सुरुवात करु, नंदकुमार चतुर्वेदी कोण आहे? पार्ल्यातील पेट्रोल पंप कोणाच्या नावावर आहे? त्याचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे? वैभव चेंबरमध्ये कोणत्या वहिनी बसतात? असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.


हेही वाचा : नारायण राणेंच्या पत्नीसह मुलाविरोधात लुकआऊट नोटीस; कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप


 

- Advertisement -