घरताज्या घडामोडीNitesh Rane: आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्याने निलेश राणेंची पोलिसांसोबत बाचाबाची

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्याने निलेश राणेंची पोलिसांसोबत बाचाबाची

Subscribe

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab Case)  यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांचा जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अखेर फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर घरी जायला निघलेल्या आमदार नितेश राणे यांच्या गाडीसमोर पोलिसांनी गाड़ी अडविल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या आवारात हायहोल्टेज ड्रामा चांगलाच रंगला. भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane)  यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पोलिसांना जाब विचारल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे, त्यामुळे ही मुदत पूर्ण होईपर्यंत पोलीस नितेश राणे यांना अटक करू शकत नाहीत, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे ,आपण कोणत्या आधारावर गाड़ी अडवली आहे ?असा मुद्दा निलेश राणे यांनी उपस्थित केला.काही काळ वातावरण तंग झाल्या नंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली . या नंतर आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयातून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर नितेश राणे यांना अटक होणार की आणखी काही दिवस अटकेपासून संरक्षण मिळणार ? याकडे लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisement -

संतोष परब हल्ला प्रकरणी अटक टाळण्यासाठी  नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथेही हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर  राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात जामीन फेटाळल्यामुळे आता नितेश राणे पुन्हा एकदा हायकोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांचे वकील वकील सतीश माने शिंदे यानी स्पष्ट केले आहे . नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यानी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे वातावरण तापले होते. मला कायदा शिकवू नका, अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. शिवाय निलेश राणे आणि पोलिसामध्येही बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी आपल्या वकिलांशीही चर्चा केली. त्यानंतर आमदार राणे जिल्हा न्यायालयाच्या आवारातून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले.

- Advertisement -

हेही वाचा – Nitesh Rane: जामिनासाठी नितेश राणेंची मुंबई हायकोर्टात धाव

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्याने निलेश राणेंची पोलिसांसोबत बाचाबाची
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -