घरमहाराष्ट्रनितेश राणे म्हणतात, 'बाळासाहेबांनी चिखलफेक आंदोलनावरुन माझे कौतुक केले असते'

नितेश राणे म्हणतात, ‘बाळासाहेबांनी चिखलफेक आंदोलनावरुन माझे कौतुक केले असते’

Subscribe

बाळासाहेब ठाकरे हयात असते,तर त्यांना चिखलफेक आंदोलन आवडले असते, असे नितेश रामे म्हणाले आहेत. बुधवारी त्यांची जामिनावर सुटका झाली.

आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले असते. शाब्बास नितेश तू केलंस ते चांगलं केलंस, असे आमदार नितेश राणे म्हणाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना नितेश राणे यांनी उप अभियंत्यांच्या अंगावर बादली भरुन चिकल ओतले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या आणखीन १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले चिखफेक आंदोलन बाळासाहेब ठाकरेंना आवडले असते, असे ते म्हणाले.

शिवसैनिकांचा आंदोलनाला पाठिंबा – नितेश राणे

नितेश राणे यांना ९ जुलै पर्यंत न्यायावलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांची जामीनावर सुटका झाली. परंतु, तरीही त्यांना दर रविविरी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी आपले आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांनी आपल्याला या आंदोलनाबद्दल शाबासकी दिली असती, असेही ते म्हणाले. याशिवाय जुन्या शिवसैनिकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलन केले ते चांगलेच केले, असे शिवसैनिक म्हणत असल्याचे नितेश राणेंनी सांगितले. त्याचबरोबर आपण आपली भूमिका फेसबुकवर लवकच मांडणार आहोत, असेही नितेश यांनी ट्विटरवर सांगितले.

- Advertisement -


हेही वाचा – नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातली चिखलाने आंघोळ

- Advertisement -

हेही वाचा – अभियंत्यावर चिखलफेकीनंतर नितेश राणे रुग्णालयात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -