घरदेश-विदेशभावना दुखावल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो, शिवसैनिकांच्या टीकेनंतर नितेश राणे बॅकफूटवर

भावना दुखावल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो, शिवसैनिकांच्या टीकेनंतर नितेश राणे बॅकफूटवर

Subscribe

आमदार नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

भाजप नेते नितेश राणे नेहमीच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टिका करत असतात. मंगळवारी विधीमंडळ परिसरात नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे हे ठाकरेंचे वंशज आहे का? असं म्हणत त्यांची डीएनए टेस्ट करावी असे वक्तव्य राणे यांनी केले होते. या वक्तव्याचे पडसाद उमटायला लागले असून शिवसैनिकांनी नितेश राणेंविरोधात राडा केला आहे. या राड्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत भावना दुखवल्या अशतील तर माझे शब्द मागे घेतो असे म्हटलं आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांसोबत संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत वादग्रस्त विधान केलं होते. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात भाजप आमदारांनी राडा केल्यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांना निलंबित केले. यामुळे भाजप नेते आक्रमक होऊन विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी भाजप नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -

नितेश राणेंची टीका

या प्रतिविधानसभेच्या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरेंचेच वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असे विधान नितेश राणे यांनी केलं होते.

शिवसैनिकांचे प्रत्युत्तर

आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत आमदार अजय चौधरी यांनी आंदोलन करत नितेश राणे यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. शिवसैनिकांच्या आंदोलनात राणेंविरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. यानंतर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली आहे.

- Advertisement -

माझे शब्द मागे घेतो – राणे

शिवसैनिकांच्या राड्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, विधानसभाबाहेरील परिसरात भाषण करताना आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. बऱ्याच जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असून जर भावना दुखावल्या अशतील तर माझे शब्द मागे घेतो अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -