नितेश राणेंची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी कोल्हापूरला हलवणार, जामीन अर्जावर होणार सुनावणी

न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

nitesh rane shift to kolhapur cpr hospital due to deteriorated in custody
नितेश राणेंची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी कोल्हापुरला हलवणार, जामीन अर्जावर होणार सुनावणी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयित भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज, शनिवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्याचा तयारी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली नेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान कालच तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर शनिवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुपारनंतर आणण्यात येण्याची शक्यता आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांन न्यायालयाने दि. 18 फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृती अस्वस्थतामुळे राणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.


हेही वाचा : आम्ही यूपी निवडणुका लढणार, 2024 च्या परिवर्तनासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार, संजय राऊतांचा हुंकार