Nitesh Rane : नितेश राणेंना अखेर जामीन मंजूर, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय

चार्जशीट दाखल केल्याशिवाय कणकवलीत येऊ नये असेही न्यायालयाने सांगितले आहे. स्वीय सहायक राकेश परबलाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Nitesh Rane sindhudurg District Sessions Court grant bail nitesh rane in santosh parab case

भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नितेश राणेंना कणकवली दिवाणी न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राणेंच्या वकिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी युक्तिवाद झाला होता. न्यायलयाने निकाल राखून ठेवला होता अखेर बुधवारी नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ३० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. नितेश राणे यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायक राकेश परबचा जामीन मंजूर केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या काळात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजप आमदार नितेश राणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नितेश राणे स्वीय सहायक राकेश परबच्या मोबाईलवरुन संपर्क करत होते असेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान नितेश राणे यांना अटक केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मंगळवारी आणि बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. दरम्यान दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. काही अटींवर नितेश राणेंचा जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत आठवड्यातून एकदा नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. चार्जशीट दाखल केल्याशिवाय कणकवलीत येऊ नये असेही न्यायालयाने सांगितले आहे. स्वीय सहायक राकेश परबलाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


हेही वाचा : वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा… अण्णा हजारेंकडून उपोषणाची हाक