दगा कोणी दिला हे पाहायचे असेल तर भाच्यापासून सुरुवात करा, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नितेश राणे म्हणाले की, उद्धवजी ठाकरे म्हणतात, की मला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला.मी उद्धव ठाकरे यांना सांगेन की, दगा नेमका कोणी दिला हे खऱ्या अर्थाने पहायचे असेल तर आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे.

bjp mla nitesh rane slams shiv sena and uddhav thackeray

ज्यांच्यासोबत २०-२५ वर्षे होते त्यांनीच आपल्याला दगा दिला असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर आता भाजप नेते नितेश राणेंनी पलटवार केला आहे. दगा कोणी दिला हे जर खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करा असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. निष्ठावान आणि विश्वासू शिवसेना आमदारांनी दगा दिल्यामुळे शिवसेनेकडून या आमदारांवर टीका करण्यात येत आहे. याविरोधात आता भाजप नेते प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.

मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी दगा दिला असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओत नितेश राणेंनी दगा आमदारांनी दिला नसून तुमच्या घरातील लोकांनीच दिला असे सांगितले आहे. नितेश राणे म्हणाले की, उद्धवजी ठाकरे म्हणतात, की मला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला.मी उद्धव ठाकरे यांना सांगेन की, दगा नेमका कोणी दिला हे खऱ्या अर्थाने पहायचे असेल तर आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे.

आपल्या अवतभोवती असलेले जे कधी निवडून न येणारे जे लोक आहेत त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही. सुरुवात करायची असेल तर ती आपल्या भाच्या पासून सुरू करा. ज्यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी तुमची बदनामी केली. सत्तेचा गैरवापर केला. लोकांच्या घराबाहेर जाणं. लोकांच्या घराबाहेर धिंगाणा घातला आणि भ्रष्टाचार करणे या सगळ्या गोष्टी तुमच्या भाच्याने केल्या. हे तुम्हाला अडीच वर्षामध्ये कळत नसल्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर ‘शिवतीर्था’वर भेटीसाठी रिघ, आमदार सदा सरवणकरांनी घेतली सदिच्छा भेट