घरमहाराष्ट्रNitesh Rane : "अभिषेक घोसाळकरांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच", नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane : “अभिषेक घोसाळकरांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच”, नितेश राणेंचा दावा

Subscribe

माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांचा नार्कोटेस्ट झाला पाहिजे, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबई : दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर फेसबुक लाइव्ह संवाद असताना आरोपी मॉरिसने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला तर, मॉरिसने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. या प्रकरणावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेवर हल्लाबोल केला आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्याही ठाकरे गटाच्या अंतर्गत सुरू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे तर, आदित्य ठाकरे विरूद्ध संजय राऊत हा गँगवॉर ठाकरे गटात सुरू आहे, असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले, “अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गँगमधील आहेत. संजय राऊत आणि आरोपी मॉरिस यांच्या काय संबंध आहे? त्यासाठी त्यांचा सिडीआर तपासले पाहिजे, अशी मागणी मी करणार आहे. कारण राऊत हे तेजसला प्रमोट करत आहे. त्यामुळेच ठाकरे गटात गँगवॉर सुरू झाले असून आता हे गँगवॉर अजून टोकाचा होत चालले आहे”, असे नितेश राणेंनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

ठाकरे गटाचे अंतर्गत गँगवॉर उद्या मातोश्रीपर्यंत पोहोचणार

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांचा नार्कोटेस्ट झाला पाहिजे. आणि मॉरिसचे उद्धव ठाकरे गटासोबत काय संबंध आहे, याची चौकशी झाली पाहिजे, या दोन मगाण्या देखील नितेश राणेंनी केल्या आहेत. नितेश राणे म्हणाले, “ठाकरे गटातील गँगवॉरमुळे सर्वजण गोळ्या मारण्यापर्यंत आलेले आहेत. आरोपी मॉरिस हा राहुल गांधींच्या मुंबईतील यात्रेच्या तयारीत आला होता. उद्धव ठाकरेंचे बॅनर लावायचा आणि तोच मॉरिस आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गोळ्या झाडतोय. त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर खडी फोडण्या अगोदर ठाकरे गटाने त्यांचे अंतर्गत गँगवार थांबविले नाही, तर यांचे वलय मातोश्रीपर्यंत पोहोचले”, अशी चिंता नितेश राणेंनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -