ठाकरे कुटुंबाला फुकटचं खायच आणि फिरायच माहिती, नितेश राणेंनी सांगितला किस्सा

ठाकरे कुटुंबाला फुकटचं खायची, फुकटचं फिरायची सवय आहे. अनेकदा ठाकरे कुटुंबासोबत जेवलो आहे, त्यामुळे ठाकरेंचा आणि बिलांचा काहीही संबंध नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Nitesh Rane told story that the Thackeray family only knew how to eat and travel free

भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी रविवारी पहाटे जबरदस्तीने एक पब चालू ठेवल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी देखील मोहित कंबोज यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पण संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप करत त्यांना डिवचले आणि त्यामुळे कंबोज यांनी तेजस ठाकरे याच्याविकरोधातील एक व्हिडीओ पोस्ट केल्याचे नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण कंबोज यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलेला असला तरी यामधील एक माहिती खोटी असल्याचे सांगत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – संजय राऊत आधुनिक काळातील शकुनीमामा, नितेश राणेंची टीका

मोहित कंबोज यांनी प्रसार माध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ दाखवला. त्यानंतर त्यांनी त्या पार्टीचे बिल दाखवले. तब्बल 97 हजारांचे हे बिल आहे. पण या बिलावर ‘पेड’ असे लिहिले आहे. पण ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. कारण ठाकरे कुटुंबाला फुकटचं खायची, फुकटचं फिरायची सवय आहे. अनेकदा ठाकरे कुटुंबासोबत जेवलो आहे, त्यामुळे ठाकरेंचा आणि बिलांचा काहीही संबंध नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी वेळीच सावध व्हावे…
नितेश राणे यांनी बिलाच्या मुद्द्यावरून ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधलेला असला तरी उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. मोहित कंबोज याला डिवचल्यानंतर ते तेजस आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत माहिती प्रसिद्ध करणार हे संजय राऊत यांना माहित होते आणि म्हणूनच मुद्दामून राऊतांनी हे सगळं केले असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

आधी बाळासाहेब ठाकरे, नंतर शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे यांची मुले आदित्य आणि तेजस ठाकरेमध्ये फूट पाडण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर संजय राऊत हे आधुनिक काळातील शकुनीमामा असल्याचे सुद्धा नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.