घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर नितेश राणेंचा हल्लाबोल, म्हणाले शिवसैनिकांवर...

आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर नितेश राणेंचा हल्लाबोल, म्हणाले शिवसैनिकांवर…

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. DINO वर निष्ठा दाखवण्यापेक्षा शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.

शिवसेनेतील युवानेता आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी आजपासून निष्ठा यात्रा (Nishttha Yatra) सुरू केली आहे. या यात्रेअंतर्गत मुंबईतील शिवसेनेच्या सर्व शाखांमध्ये आदित्य ठाकरे जाणार आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही ते दौरा करणार आहेत. शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेना वाढवण्यासाठी ही निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. मात्र, यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. DINO वर निष्ठा दाखवण्यापेक्षा शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे. (Nitesh rane tweet against aditya thackerays nishttha yatra)

हेही वाचा शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा, महाराष्ट्र पिंजून काढणार

- Advertisement -

नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात की, स्वतःचं सरकार असताना DINO वर निष्ठा दाखवण्यापेक्षा तीच निष्ठा शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढण्याची वेळ आली नसती. दरम्यान, गुजरातमधील व्यावसायिक संसदेरा बंधुंनी १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यासंबंधीच्या एका प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयाची कोट्यवधीची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्यावेळी डिनो मोरिया हा पालिकेतील सचिन वाझे आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं होतं.


शिवसेनेला बळकटी येण्याकरता आदित्य ठाकरे यांनी आजपासून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या २३६ शाखांना आदित्य ठाकरे या यात्रेच्या निमित्ताने भेट देणार आहेत. तसेच, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही ते जाणार आहेत. सेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची भेट देऊन आदित्य ठाकरे त्यांच्यातील उत्साह वाढवणार आहेत. सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना बळ देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -