घरताज्या घडामोडीअब तक छप्पन म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

अब तक छप्पन म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Subscribe

या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. त्याचं निमित्त साधत भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेला आज ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शिवसनेनेकडून जल्लोष केला जातोय. त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त पवईच्या वेस्ट-इन हॉटेलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. तेच निमित्त साधत भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane tweet on Uddhav Thackeray)

अब तक छप्पन, अब सुनो युटी की बोल बच्चन, असं ट्टिट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलणार? उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल काय सांगतील? कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी नितेश राणे यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -