घरमहाराष्ट्रराणेंना पक्षात घ्याल तर... उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती 'ही' धमकी; नितेश...

राणेंना पक्षात घ्याल तर… उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती ‘ही’ धमकी; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

Subscribe

आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. "उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली होती", असं नितेश राणेंनी सांगितलंय.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नारायण राणे शिवसेना पक्ष सोडतानाचा प्रसंग सांगितला. त्यावेळी घडलेला सर्व किस्सा त्यांनी सर्वांसमोर मांडला. नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाणार नव्हते. मात्र त्यावेळी नेमकं काय झालं? हे राज ठाकरेंनी जाहीरपणे बोलून दाखवलं. त्यावरून आता नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली होती”, असं नितेश राणेंनी सांगितलंय.

आताचे भाजप नेते नारायण राणे हे जुनै शिवसैनिक होते, हे सर्वांनाच माहित आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना काय परिस्थिती होती, काय घडलं होतं यावर आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत ही घटना समोर आणल्यानंतर पुन्हा यावर चर्चा सुरू झाली आहे. नितेश राणेंनी सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेला किस्सा खरा असल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “बाळासाहेबांच्या मागून कुजबूज करणारे ते उद्धव ठाकरेच होते. आपल्यामुळे ठाकरे पिता पुत्रांमध्ये भांडण नको म्हणून त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली की जर तुम्ही नारायण राणेंना परत घेतले तर मी बायको आणि मुलांना सोबत घेऊन मातोश्री सोडून निघून जाईन. पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे हतबल झाले व त्यांनी राज ठाकरे यांना सांगितले की नारायण राणे यांना परत बोलवू नका!”

- Advertisement -

यापुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेब देव माणूस होते. त्यांना सोडणे नारायण राणे यांना खूप जड गेले. आता उद्धव ठाकरे हे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सोडून गेलेले नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले व त्यांनी गौप्यस्फोट केला तर उद्धव ठाकरे यांना तोंड दाखवणे कठीण जाईल. त्यानंतर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले. काल शिवतीर्थावर राज ठाकरे म्हणाले ते वास्तववादी सत्य होते. शिवसेना संपवण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -