घरमहाराष्ट्रNitesh Rane : ठाकरे आणि केजरीवाल यांच्या त्या भेटीचे कनेक्शन काय? नितेश...

Nitesh Rane : ठाकरे आणि केजरीवाल यांच्या त्या भेटीचे कनेक्शन काय? नितेश राणेंचा सवाल

Subscribe

मुंबई : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ई़डीने अटक केली आहे. याचाच संदर्भ देत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Maha Politics : भाजपासोबत राज ठाकरेंच्या युतीला मुंबईतील उत्तर भारतीयांचा विरोध; या सेनेने दिले आव्हान

- Advertisement -

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्‍च न्‍यायालयात केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा कोणालाही अटक करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना हे अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंगं, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सगळ्यांची भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले. मोदींचे सरकार त्याच पद्धतीने काम करत आहे, असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.

हेही वाचा – Baramati Loksabha: महायुतीत तणाव! पक्षाचं ऐकत नसल्याने विजय शिवतारेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई?

संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकाऱ्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. ही भेट कशासाठी होती? राजकीय भेट होती की सदिच्छा भेट होती? की त्याच्यामागे मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन आहे? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. दिल्लीमध्ये मद्य धोरणावर शिक्कामोर्तब होत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडीने 50 टक्के करसवलत दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Kejriwal : आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे…, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -