घरमहाराष्ट्र'भांडुपच्या देवानंद'चा शो भरलाच नाही..; नितेश राणेंनी कोणावर साधला निशाणा?

‘भांडुपच्या देवानंद’चा शो भरलाच नाही..; नितेश राणेंनी कोणावर साधला निशाणा?

Subscribe

संजय राऊत विरूद्ध नितेश राणे हा कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. आता पुन्हा एकदा नितेश यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. 'भांडुपच्या देवानंद'चा शो भरलाच नाही, अशा आशयाचे ट्वीट करत नितेश राणे यांनी राऊतांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनलेले आहेत. प्रामुख्याने नितेश राणे हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना प्रतित्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत असतात. ते नेहमीच राऊतांवर निशाणा साधण्याच्या तयारीत असतात. नितेश राणे यांचे बहुतांश ट्वीट हे संजय राऊत यांच्यावर टीका करणारेच असतात. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध नितेश राणे हा कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. आता पुन्हा एकदा नितेश यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ‘भांडुपच्या देवानंद’चा शो भरलाच नाही, अशा आशयाचे ट्वीट करत नितेश राणे यांनी राऊतांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

हेही वाचा – औरंगाबादेतील कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

- Advertisement -

आज (ता. 08 जून) औरंगाबादेतील पहिल्या शाखेचा 38 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. पण या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहुन राऊतांकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे. तर आजच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते का आले नाहीत, याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मनिरीक्षण करावे, असा सल्ला यावेळी संजय राऊत यांनी दिला. त्यांच्या याच कार्यक्रमावरून नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

“भांडुपच्या देवानंद” चा छत्रपती संभाजी नगर चा शो भरलाच नाही.. वाटा पेढे ! असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. राणेंनी फक्त हे ट्वीटच केलेले नाही तर त्यांनी हे ट्वीट संजय राऊत यांना टॅग देखील केले आहे. त्यामुळे आता राणेंच्या या ट्वीटला राऊत नेमके काय प्रतित्युत्तर देणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

याआधी अनेकदा मराठवाड्यात आलो. पण कधी खुर्च्या कमी पाहिल्या नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात खंत व्यक्त केली. त्यामुळे हे असे का घडले? याचे आपल्या प्रमुख नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देखील यावेळी संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला. या सभागृहात फक्त पदाधिकारी आले आहेत, त्यांनी आपल्या सोबत 10-10 शिवसैनिक आणलेले नाहीत. ते का आले नाही, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे, असेही राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे राऊतांच्या याच वक्तव्याची नितेश राणे यांच्याकडून खिल्ली उडविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -