घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या घरावरील ईडी छापा प्रकरणी नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

संजय राऊतांच्या घरावरील ईडी छापा प्रकरणी नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

संजय राऊत यांच्या घरी सकाळी ईडीने छापा टाकला असून राऊत यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पत्राचाळ प्रकरणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. ईडीचे दहा अधिकारी राऊतांची आज सकाळपासून चौकशी करत आहेत. एकूण तीन पथके ही चौकशी करत आहेत, यात ईडीचे पंचवीस अधिकारी असल्याचे समजते आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे.

नितेश राणे काय म्हणाले –

- Advertisement -

यावर बोलताना नितेश राणे यांनी रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ आज खराब झाली यामुळे चांगल वाटतंय. पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होते. मात्र, आता सुकेंगा नही असे विचारा त्यांना असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. पुढे त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैर वापर सुरू आहे. मात्र, लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजावी लागेलच असेही राणेंनी म्हटले आहे.

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊतांना अटक –

- Advertisement -

पत्राचाळ प्रकरणात 1039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करत आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली असून कार्यकर्ते संजय राऊतांच्या समर्थनार्थ जोरजोर घोषणा देत आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -