घरताज्या घडामोडीNitesh Rane: नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

Nitesh Rane: नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

Subscribe

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सत्र न्यायालयात सुनावणी करताना सरकारी वकिलांनी नितेश राणेंविरोधातील पुरावे सादर केले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. राणेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. हायकोर्टात नितेश राणे यांना दिलासा मिळणार असा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस चौकशी करत आहेत. या चौकशीमध्ये आमदार नितेश राणे यांचेही नाव आले आहे. नितेश राणे सध्या गायब आहे. परंतु त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात केला होता. सत्र न्यायालयात २ ते ३ दिवस या अर्जावर सुनावणी झाली. कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्या निर्णयावर आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवार ३ जानेवारी २०२२ रोजी तातडीची सुनावणी ठेवण्यात आली आहे.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सत्र न्यायालयात सुनावणी करताना सरकारी वकिलांनी नितेश राणेंविरोधातील पुरावे सादर केले आहेत. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यातील धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कशाप्रकारे पोहचत आहेत. याची सविस्तर माहिती दिली आहे. सरकारी वकिल आणि नितेश राणेंच्या वकिलांमध्ये कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधान मोदी अहंकारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ५ मिनिटांच्या चर्चेतही वाद, राज्यापालांच्या दाव्याने एकच खळबळ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -