उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर CRZ विभागाला जाग आली का?, अधिशवरील कारवाईवरुन नितेश राणेंचा सवाल

चंद्रकांत खेरे हे काय सकाळी आमच्या घरी काय चहा घेऊन येतात का?, त्यांना माहीत व्हायला की आमच्या घरी आम्ही कोणाला पैसे वाटतोय हे बघायला. ते माजी खासदार आहेत की बँकेचे मॅनेजर आहेत ? खैरे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Nitesh Rane targets Chief Minister Uddhav Thackeray over From increased construction
मुंबईकर कौरवांच्या मर्जीच राज्य अनुभवत आहेत, नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिश बंगल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राणेंना १० जून रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सोबत बंगल्यासंबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु या बंगल्याला अनेक वर्षे झाली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून सीआरझेड विभागाला जाग आली का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आम्ही त्यांच्या नोटीसला १० जूनला उत्तर देऊ असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील अधिश बंगल्यावर केलेल्या कारवाईवरुन प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नितेश राणे म्हणाले की, सगळ्या नोटीसा ह्या फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटतात काय? आमच घर बारा वर्षापासून तिथे आहे. आत्ताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? आताच सी आर झेड विभागाला जाग आली का ? जे उत्तर द्यायचं ते आम्ही १० जूनला देऊ. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच कशा काय होतात असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. अगोदर समुद्र नव्हता आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून समुद्र मुंबईत आला आहे का? नोटीसला आम्ही उत्तर देऊ असा पलटवार नितेश राणेंनी केला आहे.

चंद्रकांत खैरे माजी खासदार की बँकेचे मॅनेजर?

भाजपकडून कोट्यवधी रुपये वाटण्यात आले असल्याचा आरोप शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यावर नितेश राणेंनी पलटवार केला आहे. चंद्रकांत खेरे हे काय सकाळी आमच्या घरी काय चहा घेऊन येतात का?, त्यांना माहीत व्हायला की आमच्या घरी आम्ही कोणाला पैसे वाटतोय हे बघायला. ते माजी खासदार आहेत की बँकेचे मॅनेजर आहेत ? खैरे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.


हेही वाचा : नारायण राणेंना अधिश बंगला प्रकरणी पालिकेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस, अडचणीत वाढ होणार?