Nitesh Rane : नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी

Nitesh Rane files application in Mumbai High Court for pre-arrest bail

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत कणकवली दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे आता सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. नितेश राणे यांच्यासह राकेश परबलासुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेसुद्धा शुक्रवारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. नितेश राणे यांच्या जामिनासाठी आजच सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे वकील मानेशिंदे यांनी सांगितले.

आमदार नितेश राणे २ फेब्रुवारी रोजी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. राणे न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. तसेच फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आजही नितेश राणेंना दिलासा मिळाला नाही.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर तात्काळ जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज करण्यात येणार आहे, असे राणे यांचे वकील मानशिंदे व संग्राम देसाई यांनी सांगितले. दरम्यान मोबाईल जप्त करून सुद्धा पोलिसांना कुठलाही पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, असे देसाई म्हणाले.


हेही वाचा : Attack On Owaisi : उत्तर प्रदेशातील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींना Z+ सुरक्षा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय