घरमहाराष्ट्र'इंडिया इनोव्हेशन इंडेक्स'मध्ये महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप

‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप

Subscribe

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती

कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तसंच संकल्पनांचा विकास यामधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्रानं दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. नीती आयोगानं २० जानेवारीला ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्राला दुसरं स्थान मिळाले आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.  राज्यातील अनेक शासकीय विभागांच्या तसंच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई फिनटेक हब यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्राला हे यश मिळालं आहे .महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसीच्या माध्यमातून राज्य सरकार स्टार्टअप आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं मलिक यांनी यावेळी सांगितलं. नीती आयोगाने २० जानेवारी रोजी ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’चा निकाल जाहीर केला. यात तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. राज्याने २०१९च्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावरून २०२०मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात येते. हा अहवाल तयार करीत असताना नावीन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो. इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार केली जाते. यात इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांचा अनुक्रमे समावेश होतो. शेवटचा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. राज्य व केंद्रशासित प्रदेशांची इनोव्हेशन कॅपबिलिटीजचे मूल्यांकन करणारा अशा प्रकारचा हा अहवाल गतवर्षी पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक शासकीय विभागांच्या तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई फिनटेक हब इत्यादींच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरे आले आहे. राज्य सरकारने हे निश्चित केले आहे की, महाराष्ट्र राज्य यात अग्रेसर असेल. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसीच्या माध्यमातून शासन स्टार्टअप व इनोव्हेशनला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप विकचे आयोजन, राज्यभर इन्क्युबेटरचे जाळे तयार करणे, स्टार्टअप यात्रासारख्या उपक्रमाचे आयोजन, स्टार्टअपसाठी भरीव आर्थिक तरतूद इत्यादी उपक्रमांच्या साहाय्याने राज्याला एक महत्त्वपूर्ण इनोव्हेशन परिसंस्था बनविले जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा-

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -