घरताज्या घडामोडीबायकोच्या भरवशावर राजकारण करणारा.., राणांवर टीका करताना देशमुखांची जीभ घसरली

बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा.., राणांवर टीका करताना देशमुखांची जीभ घसरली

Subscribe

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नितीश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु रवी राणांवर टीका करताना नितीन देशमुखांची जीभ घसरली.

नितीश देशमुख यांनी रवी राणांबद्दल बोलताना अपशब्दाचा वापर केला आहे. बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा, असा उल्लेख त्यांनी केला. रवी राणा नेमका आहे कुठला?, त्याची पैदास कुठली? हेही महाराष्ट्रातील कुणाला माहिती नाही. रवी राणा हा बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा आहे. मी त्याच्यासारखं बायकोच्या भरवशावर राजकारण करीत नाही. मतदारच आगामी निवडणुकीत राणाला त्याची जागा दाखवणार, असं नितीन देशमुख म्हणाले.

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांची संपत्ती मीच घेऊन दिलेली आहे. त्यांचा बंगलाही मीच घेऊन दिल्याचा टोला आमदार नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्यांना लगावला.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुख यांना 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, 17 तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. एसीबीने आतापर्यंत ठाकरे गटाच्या तीन आमदारांना नोटीस पाठवली आहे.


हेही वाचा : अवैध मालमत्ता प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -