घरताज्या घडामोडीनाशिक- मुंबई २ तास प्रवास, एकही आश्वासन खोटं होणार नाही, गडकरींची मोठी...

नाशिक- मुंबई २ तास प्रवास, एकही आश्वासन खोटं होणार नाही, गडकरींची मोठी घोषणा

Subscribe

नाशिकरोड ते द्वारका या एलिव्हेटेड मार्गावर २१०० कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प बांधण्यासाठी मंजूरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रम पुर्वनियोजित आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिकते – मुंबईचा प्रवास सध्याच्या घडीला ३ ते ४ तासाचा आहे. खड्ड्यांमुळे हा प्रवार ५ ते ६तासांचा झाला आहे. परंतु येत्या काही दिवसांत नाशिक-मुंबई केवळ २ तासांच पोहचता येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यभरात अनेक विकासकामे, उड्डाणपुल, डबलडेकर उड्डणपुल बांधणार असल्याच्या घोषणा नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. यातील एकही आश्वासन खोटं ठरणार नाही, टेप करुन ठेवा असे गडकरींनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी नाशिकमध्ये विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, महाविकास आघाडीतील नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. येणाऱ्या काळात नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल असे गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच आपण खोटं बोलत नसून टेप करुन ठेवा यातील एकही आश्वासन खोटं ठरणार नाही असे रोखठोक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नाशिकमध्ये २०४८ कोटींच्या विकासकामांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. गडकरींनी नाशिकमध्ये ४१४ कोटी रुपये खर्चाच्या ६ प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरण केलं आहे. नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल बांधण्याच्या प्रकल्पाला गडकरींनी मंजूरी दिली आहे. तसेच नाशिकमधील नाशिकरोड ते द्वारका या एलिव्हेटेड मार्गावर २१०० कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प बांधण्यासाठी मंजूरी दिली आहे. तर गंघापूर ते नाशिकरोड या मार्गावर डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याची मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी, अपघात यासारखे प्रश्न सुटतील असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाचे आगामी २ वर्षांत काम सुरु करण्याचा मानस असून २ वर्षांत उद्घाटनासाठी येईल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.

मुंबई ते दिल्ली १२ तासात प्रवास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई ते दिल्ली १२ तासात प्रवास करणं शक्य होणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई ते दिल्लीच्या महामार्गाचे काम ७० टक्के पुर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील रस्ता बाकी आहे. हा रस्ता आजा जेएनपीटीपर्यंत नेण्यात येणार सल्याचे गडकरींनी म्हटलं आहे.

- Advertisement -

लाल दिव्यानंतर वाहनांचे सायरन बंद होणार

नितीन गडकरी यांनी लाल दिवे बंद केल्यानंतर आता देशातील वाहनांचा सायरनचा आवाज बदलणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ध्वनी प्रदुषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. रुग्णवाहिकांचे देखील सायरन बदलण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. आगामी काळात सायरनऐवजी लवकरच आकाशवाणीवर वाजणारी धून ऐकू येईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्प

हा द्रुतगती मार्ग (Access Control) असुन प्रकल्प पूर्णझाल्यांनतर सुरत ते सोलापूर दरम्यान 95 किलोमीटरचे अंतर कमी होईल आणि सुरत ते चेन्नई प्रवास करण्यासाठी सुमारे 200 किमीचे अंतर कमी होईल. नाशिक ते सुरत अंतर अवघ्या दिड तासात कापला येईल. हा प्रकल्प 3 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असुन प्रवसाचा कालावधी देखील कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातुन एक्सप्रसवे जात असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पिंपरीसदो ते गोंदे मार्गाचे होणार सहापदरीकरण

पिंपरीसदो ते गोंदे हे 20 कि.मी. सहापदरी केल्यानंतर नाशिककरांना मुंबईचा संपूर्ण प्रवास सहापदरी रस्त्याने होईल. अंदाजित खर्च 600 कोटी असेल. ह्यात 10 अंडरपासेस, 3 रोब आणि सर्व्हिस रोड चा समावेश असून या प्रकल्पामुळे मुंबई जलद आणि सुरक्षित कनेक्टिव्हीटी होईल. बहुमुल्य वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. परिसराचा सर्वागिण विकासाबरोबरच , नवे उद्योग आणि रोजगार निर्मिती गोंदे एम.आय.डी.सी. चा विस्तार आणि रोजगार वाढीस चालना मिळणार आहे.

नाशिकरोड ते व्दारका चौक ईलिव्हेटेड कॉरिडोर होणार

नाशिकरोड ते व्दारका चौक हा नाशिक- पुणे (रा.म.क्र. 50) चा भाग असुन नुकताच भारतमाला परियोजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे व्दारका चौकातील वाहतुक कोंडी नामशेष होणार असून नाशिक रोड ते व्दारका प्रवास फक्त अर्ध्यां वेळेत होणार आहे. चौका चौकातल्या वाहतुक कोंडीचे निराकरणासोबत अपघातांची मालिका खंडीत होऊन प्रवास सुखद, सुरक्षित आणि सहज होईल.
महामार्ग प्रकल्प

कोनशिला समारंभ

राष्ट्रीय महामार्ग 3 वरील चार नंबर श्रेणीची विविध बांधकामे, कल्याण/बापगाव,वशिंद, आसनगाव, आणि कसारा/वशाला जंक्शन. लांबी :3 किमी, खर्च 84 कोटी रु
राष्ट्रीय महामार्ग 3 वरील वरपे-गोंडे पट्ट्यात घोटी-सिन्नर जंक्शन जवळ उड्डाणपूल. 1.6 किमी, खर्च -44 कोटी
राष्ट्रीय महामार्ग 3 वर धुळे-पिंपळगाव विभागात पुरमपाडा इथं व्हीयूपी. लांबी- 1.2 किमी, किंमत: 27 कोटी
राष्ट्रीय महामार्ग 3 वर वडपे-गोंडे विभागात खान्देवली जंक्शन इथे व्हीयूपी. लांबी- 00.70 किमी, किंमत-24 कोटी.
राष्ट्रीय महामार्ग 753J वरील नांदगाव-मनमाड भागाचे अद्ययावतीकरण. लांबी- 21 किमी, खर्च- 211 कोटी
राष्ट्रीय महामार्ग 60 वर सिन्नर- नाशिक मार्गावर, 185/500 व्हीयूपी @ Ch. लांबी- 0.8 किमी, किंमत : 25 कोटी

राष्ट्रार्पण करण्यात आलेले प्रकल्प:

के के डब्लू महाविद्यालय ते हॉटेल जत्रा दरम्यान उन्नत मार्गिका आणि पिंपळगाव(बी) येथे चार उड्डाणपूल, कोकणगाव आणि ओझरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 3. लांबी 8 किमी. खर्च रु. 448 कोटी
विल्होली, ओझर येथे व्हीयूपी, गोदावरीवर मुख्य पूल आणि नाशिक शहरात एनएच-3 वर रस्ता सुरक्षा कामे. लांबी 4.5 किमी. खर्चः रु. 57 कोटी.
एनएच-953 च्या सापुतारा- वणी- पिंपळगाव बसवंत सेक्शनचे अपग्रेडेशन, लांबीः 40 किमी, खर्च रु. 184 कोटी.
एनएच-160 च्या कुसुंबा मालेगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः 42 किमी. खर्च रु. 203 कोटी.
एनएच-753J. च्या चाळीसगाव- नांदगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः44किमी. खर्चः रु. 169 कोटी.
एनएच-848 च्या नाशिक- पेठ ते राज्य सीमा सेक्शनचे रुंदीकरण/ बळकटीकरण. लांबीः 39 किमी. खर्चः रु. 203 कोटी.


हेही वाचा :  लाल दिव्यांपाठोपाठ आता वाहनांचे सायरनही होणार बंद, वाचा काय आहे कारण..


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -