घरताज्या घडामोडीनाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी, नितीन गडकरींची मागणी

नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी, नितीन गडकरींची मागणी

Subscribe

ठाकरे सरकारने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कोणाला मारण्याचे, शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला केला. एफआयआर न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा राम कदम यांनी दिला.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांना मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले आहेत. याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा नाना पटोले यांना अटक करण्याची मागण केली आहे. नाना पटोले यांनी मोदींविरोधात केलेले वक्तव्य निंदनीय आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे. भाजप युवा मोर्चाकडून नाना पटोलेंच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजप नेते राम कदम यांनीही नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. भाजप नेते राम कदम म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात त्वरीत एफआयआर नोंदवावा. त्यांची जागा लोकांमध्ये नसून तुरुंगात आहे. ठाकरे सरकारने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कोणाला मारण्याचे, शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला केला. एफआयआर न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा राम कदम यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा : महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -