घरदेश-विदेशNitin Gadkari: मी फक्त एक कार्यकर्ता, मला पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही, गडकरींची दिलखुलास...

Nitin Gadkari: मी फक्त एक कार्यकर्ता, मला पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही, गडकरींची दिलखुलास उत्तरं

Subscribe

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुका आता अगदी जवळ आल्या असून, सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजपा) मनापासून तयारी करत आहे. यावेळी भाजपा 370 जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल, असा प्रश्न चर्चिला जात आहे. याबाबत पक्षाच्या काही नावांची चर्चा असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचाही समावेश आहे. आता ते पीएम मोदींचे उत्तराधिकारी असतील का या प्रश्नाचे उत्तर नितीन गडकरींनी दिले आहे. नितीन गडकरींनी पीएम मोदींसोबतच्या जुन्या वैराबद्दलही सांगितलं. (Nitin Gadkari I m just a worker I don t aspire to become PM Nitin Gadkari s candid reply)

एका खासगी वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या जुन्या शत्रुत्वाबद्दल सांगितलं, या 20-25 वर्षे जुन्या गोष्टी आहेत आणि त्यांना त्यावर काहीही बोलायचे नाही. या गोष्टी आता संपल्या आहेत. संजय जोशी हे राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रचारक असून ते त्यांचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक, पीएम मोदी आणि संजय भाई जोशी यांच्यात 90 च्या दशकापासून वैर आहे. या वैरामुळे नितीन गडकरी आणि पीएम मोदी यांच्यातील संबंध बिघडले होते.

- Advertisement -

नितीन गडकरी म्हणाले, मी भाजपाचा अध्यक्ष असताना संजय जोशी माझे सरचिटणीस होते. त्यांनी लोकसभेचे तिकीट कधीच मागितले नाही.” यावेळी नितीन गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी होणार का, असं विचारण्यात आलं , यावर नितीन गडकरी म्हणाले, ‘ही अनावश्यक चर्चा आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे आणि आमचे चांगले संबंध आहेत.

भाजपमध्ये निवृत्तीचे वय किती ?

एका प्रश्नाच्या उत्तरात नितीन गडकरी म्हणाले की, ‘आपण त्यांना सल्ला कसा देऊ शकतो? ते पंतप्रधान आहेत आणि आम्ही मंत्री आहोत त्यामुळे ते आम्हाला आदेश देतील. आम्ही सल्लामसलत करतो. भाजपने आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे निवृत्तीचे वय 75 वर्षे ठेवले आहे. पीएम मोदीही लवकरच या उंबरठ्यावर पोहोचणार आहेत. त्यांचे वय 73 वर्षे आहे. अशा स्थितीत त्यांच्या वारसदाराची अनेकदा चर्चा होते. नितीन गडकरी सध्या 66 वर्षांचे आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे नावही यासंदर्भात अनेक चर्चेत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Pravin Darekar : जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार; दरेकरांनी केला पुनरुच्चार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -