घरमहाराष्ट्रनितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, कार्यालयात २ फोन

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, कार्यालयात २ फोन

Subscribe

राजकारणातील अजातशत्रू असलेल्या गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले अन् एकच खळबळ उडाली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळच्या सुमारास दोन वेळा फोन करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ माजली. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात दाखल झाले आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिलाय. नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोर नितीन गडकरींचं हे जनसंपर्क कार्यालय आहे. नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

- Advertisement -

नितीन गडकरींना धमकीचे फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १४ जानेवारी रोजी गडकरींना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. धक्कादायक म्हणजे मागच्या वेळी ज्या गुंडाच्या नावाने धमकी देण्यात आली होती, त्याच गुंडाच्या नावाने आज सकाळी पुन्हा एकदा दोन वेळा कॉल आले. जयेश पुजारी असं या गुंडाचं नाव आहे. या कुख्यात गुंडावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूलीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो कर्नाटकातील कारागृह तोडून फरार देखील झाला होता. पुन्हा एकदा त्याच गुंडाच्या नावाने आज दोन वेळा धमकीचे फोन आल्यानं पोलीस यंत्रणेच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या गुंडाला जयेश कांता नावाने देखील ओळखलं जातं.

राजकारणातील अजातशत्रू असलेल्या गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले अन् एकच खळबळ उडाली. सर्वांशी चांगले संबंध असणाऱ्या गडकरी यांना कोण धमकी देऊ शकतं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला. आज सकाळी आलेल्या धमकीच्या फोननंतर नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -