घरमहाराष्ट्रनितीन गडकरींनी केली इंदिरा गांधींची स्तुती

नितीन गडकरींनी केली इंदिरा गांधींची स्तुती

Subscribe

इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील सर्वात सक्षम नेत्या होत्या. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या विचारधारेविरोधात भूमिका घेतली आहे. इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील सर्वात सक्षम नेत्या होत्या. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं आहे. नितीन गडकरी यांनी केलेलं वक्तव्य हे भाजप विचारधारेच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूरमधील स्वयंसेविकाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण देताना इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. इंदिरा गांधी यांनी स्वबळावर सत्ता काबीज केली. इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील अनेक पुरुष नेत्यांपेक्षाही सक्षम नेत्या होत्या अशा शब्दात नितीन यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुक केले आहे.

नरेंद्र मोदी करतात टिका

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम इंदिरा गांधी यांच्यावर टिका करतात. पण, त्यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गडकरींच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीची देखील टिका केली आहे. कोणत्याही आरक्षणाशिवाय इंदिरा गांधी यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी आहे. अशा शब्दात नितीन गडकरी यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -