Nitin Gadkari: ‘जेव्हा नितीन गडकरी हफ्त्यावर टीव्ही घेण्यासाठी जातात’, गडकरींनीच सांगितला मजेदार किस्सा

nitin gadkari tells how they inspired road in installment on TV shop experience
Nitin Gadkari: 'जेव्हा नितीन गडकरी हफ्त्यावर टीव्ही घेण्यासाठी जातात', गडकरींनीच सांगितला मजेदार किस्सा

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या सर्वांचेच लाडके नेते आहेत. गडकरींनी अल्प काळातच नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे राजकारणातही कोणाशी वैर नसून अगदी विरोधकांचेही ते लाडके नेते आहेत. नितीन गडकरींना इन्स्टॉलमेंटरवर रोड तयार करण्याची कल्पना ते एकदा इन्स्टॉलमेटवर टीव्ही घेण्यासाठी गेले होते तेव्हा सुचली आहे. मात्र टीव्ही घेण्यासाठी गडकरी गेले तेव्हाचा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली ते मुंबईचा प्रवास आता १२ तासात होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी बोलताना टीव्हीचा किस्सा सांगितला आहे. गडकरी म्हणाले की, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सी लिंकचे बांधकाम झाल्यावर पैसे वसूल झाले. यानंतर पहिला बीओटी रोड बनवण्याची संधी मला मिळाली पहिली योजना बनली तेव्हा मी दिल्लीत गेलो होतो.

परंतु त्या रोडसाठी प्रोत्साहन मला मलबार हिलमध्ये भेटले जेव्हा मी टीव्ही घेण्यासाठी गेलो होतो. मी नवीन मंत्री झालो आणि माझ्या घरी कलर टीव्ही घ्यायचा होता. मी ज्या इमारतीमध्ये राहत होतो तिथे न्यायधीश राहत होते आणि मी एकटा पीडब्लूडी मंत्री होतो. मला फ्रिज आणि टीव्ही सरकारी नियमांमुळे नाही भेटणार असे सरकारकडून सांगण्यात आले. मी म्हणालो या न्याधीशांना सरकारी बजेटमधून टीव्ही आणि फ्रिज मिळते तर मला का नाही मिळू शकत.. सरकार म्हणाले त्यांनी तसा निर्णय़ करुन घेतला आहे. तुम्हालाही तसा निर्णय करावा लागेल.. मी म्हणालो राहुद्या माझ्यासाठी निर्णय करु नका.

नंतर मी एका टीव्हीच्या दुकानात गेलो आणि म्हणालो मला हफ्त्यावर टीव्ही दाखवा. दुकानदाराने टीव्हा दाखवला मी एक टीव्ही निवडला. परंतु त्या दुकानदाराला समजले की मी मंत्री आहे. त्यावर तो म्हणाला सर हा टीव्ही राहू द्या मी तुम्हाला नवीन टीव्ही आल्यावर देतो. नंतर त्याच्याकडे काही नवीन टीव्ही आला नाही आणि मला टीव्ही मिळाला नाही. कारण त्याला समजले असावे हे मंत्री आहेत. ते काही हफ्ता देणार की नाही देणार? परंतु तेव्हा विचार आला की टीव्ही, फ्रिज, गाडी इन्स्टॉलमेंटवर मिळू शकते तर बोगदा (टनल) आणि रस्ते का नाही बनू शकत? अशा प्रकारे गडकरींना रस्ते इन्स्टॉलमेंटवर बांधण्याची कल्पना सूचली असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : Omicron variant: ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसरा डोस पुढील वर्षापासून, या लोकांपासून होणार सुरुवात