घरमहाराष्ट्रबेळगाव तुरुंगातूनच नितीन गडकरींना देण्यात आली धमकी; आरोपीची ओळख पटली

बेळगाव तुरुंगातूनच नितीन गडकरींना देण्यात आली धमकी; आरोपीची ओळख पटली

Subscribe

नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी तीनवेळा निनावी फोन आला. गडकरी यांच्याकडे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नागपूर पोलीस खडबडून जागे झाले. फोन कुठून आला. कोणी केला. याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

नागपूरः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगाव तुरुंगातून एका आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे. धमकी देणारा आरोपी खुनाच्या गुन्ह्यासाठी तेथे शिक्षा भोगत आहे. मंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

जयेश कंठा असे या आरोपीचे नाव आहे. बेळगाव येथील तुरुगांत तो हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहातून केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकीचे फोन केले होते. धमकीचे फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपास करुन या आरोपीचा शोध घेतला.

- Advertisement -

नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी तीनवेळा निनावी फोन आला. गडकरी यांच्याकडे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. नागपूर पोलीस खडबडून जागे झाले. फोन कुठून आला. कोणी केला. याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

याबाबत अधिक माहिती देताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांना बेळगावच्या कारागृहातून धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे. त्याची शिक्षा तो कारागृहात भोगत आहे. कारागृहातही त्याने फोनचा बेकायदेशीरपणे वापर केला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव कंठा असे आहे. त्याची ओळख पटली आहे. त्याच्याकडून कारागृह प्रशासनाने डायरीही जप्त केली आहे. त्याला गडकरी यांच्या कार्यालयाचा फोन क्रमांक कोणी दिला. त्याने का फोन केला. कोणाच्या सांगण्यावरुन फोन केला, याची चौकशी करण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला निघाले आहे. नागपूर पोलीस आरोपीच्या कोठडीची मागणी करणार आहे.

- Advertisement -

बीएसएनएल क्रमांकावरून गडकरींच्या कार्यालयात शनिवारी सकाळी ११.२५, ११.३२ आणि दुपारी १२.३२ वाजता, असे तीन कॉल आले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ या कॉलचा तपशील तपासला. त्यातून आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मंत्री गडकरी यांचे कार्यक्रम जेथे आहेत तेथेही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -