घरमहाराष्ट्रनिवृत्तींच्या बातम्यांवर गडकरी संतापले, म्हणाले - मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्यात

निवृत्तींच्या बातम्यांवर गडकरी संतापले, म्हणाले – मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्यात

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांनी केलेले विधान मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने संताप व्यक्त केला आहे. मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्यात, असे गडकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यामुळे ते कधी-कधी त्यांच्या पक्षाला सुद्धा अप्रत्यक्षपणे घरचा आहेर देताना मागे-पुढे पाहत नाहीत. पण गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. पण या विधानाचा मीडियाने चुकीचा अर्थ काढल्याने गडकरी चांगलेच संतापलेले आहेत. राजकारणातून निवृत्त होण्याचा कोणताही विचार करत नसल्याचे गडकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला मत द्या, नाही तर नका देऊ, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या भुमीपुजनाच्यावेळी केले होते.

या विधानावरून नितीन गडकरी हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार आहेत का? अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्या होत्या. तर मीडियाने सुद्धा अशा आशयाच्या बातम्या लावल्या होत्या. पण आता या बातम्यांमुळे संतप्त झालेले नितीन गडकरी म्हणाले की, “राजकारणातून निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही, मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्या.”

- Advertisement -

“तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता जास्त लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक, नाहीतर कोणीतरी नवा येईल.” असे वक्तव्य एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात आले होते. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात होत्या. पण आता अखेरीस गडकरी यांच्या या प्रतिक्रियेमुळे या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेली अशी वक्तव्ये काही नवीन नाहीत. याआधीही त्यांनी केलेल्या अशा वक्तव्यांची नेहमी चर्चा झाली आहे. पण जेव्हा गडकरी असे बोलतात त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. नितीन गडकरी नाराज आहेत किंवा पक्ष गडकरींबाबत कठोर आहे अशा चर्चा देखील याआधी करण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपकडून “सावरकर गौरव यात्रेचा” टीजर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -