घरताज्या घडामोडीशनिवार, रविवार मार्केट बंद; नागपूरची नवी नियमावली जाहीर

शनिवार, रविवार मार्केट बंद; नागपूरची नवी नियमावली जाहीर

Subscribe

नागपूर शहरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील महत्त्वाच्या शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अमरावती पाठोपाठ आता नागपूर शहरात देखील कडक निर्बंध लावण्याचा निर्णय नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. शनिवारी आणि रविवारी, असे दोन दिवस मार्केट बंद राहणार आहे. कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमध्ये दिवसाला १० हजार चाचण्या

राज्यातील सर्वच शहरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. दररोज नागपूरमध्ये दिवसाला १० हजार चाचण्या केल्या जातात. तर मुंबईत हा आकडा ११ हजार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

काय आहे नियमावली?

  • नागपूरमध्ये शनिवार, रविवार मार्केट बंद!
  • शाळा, कॉलेजच आणि इतर क्लासेमधील विद्यार्थ्यांना शनिवारी आणि रविवार घराबाहेर पाठवू नका
  • वाचनालय ७ मार्चपर्यंत बंद
  • गार्डन, वॉकिंग प्लाझा, जिम, पेट्रोल पंप, भाजीपाला, फळे, दूध सुरू

जिल्ह्यात ३ पटींपेक्षा जास्त चाचण्या

नागपूर जिल्ह्यात तीन पटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. तसेच नागपूरमध्ये रुग्णालयांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात १ हजार ७६९ ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ६८४ आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर २६३ व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे.


हेही वाचा – केरळ प्रवासी ट्रेनमधून स्फोटकांचा साठा जप्त, १०० जिलेटीन कांड्या, ३५० डिटोनेटर ताब्यात

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -