घरमहाराष्ट्रआम्ही बांगड्या भरल्या नाहीत, भिकारीही नाही

आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, भिकारीही नाही

Subscribe

मराठा आरक्षण, मागसवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत ऊर्जामंत्री राऊत यांनी मांडली स्पष्ट भूमिका

राज्यात आरक्षणाचा प्रश्न चर्चेत असताना काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. नितीन राऊत मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी अहमदनगरला थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, मागसवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण यासंबंधी आपली भूमिका मांडली.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यांनीही मोठे मन दाखवले पाहिजे. आमचे भांडवल करून स्वत:साठी लढू नये. अन्यथा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत किंवा आम्ही भिकाराही नाहीत. राज्य घटनेने जे दिले आहे, ते आम्ही मागत आहोत,’ अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. तसंच ‘आक्षणासंबंधी २१ जून रोजी न्यायालयाचा निकाल काय येतो, ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -