घरमहाराष्ट्रकोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळशाचा तुटवडा - नितीन राऊत

कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळशाचा तुटवडा – नितीन राऊत

Subscribe

देशात कोळशाचा तुटवडा पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कोल इंडिया कंपनीवर टीका केली आहे. कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, असं नितीन राऊत म्हणाले. याचा परिणाम महानिर्मिती कंपनीवर झाला असून कोळशाचा काटकसरीने वापर करण्याचा प्रयत्न महावितरणकडून सुरु असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.

स्वस्त वीज मिळत नसल्याने महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. कोल इंडियाच्या ढिसाळ कारभार आणि नियोजन अभावी देशात कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळा लक्षात घेता कोळशाचा पुरेसा साठा करणं अपेक्षित होतं. मात्र कोल इंडियाने पावसाळ्यापूर्वी कमी उत्खनन केल्याने कोळशाचा साठा कमी करण्यात आला नाही. याशिवाय, कोळशाचे दर गगनाना भिडल्यामुळे खासगी वीज उत्पादकांनी कोळशाची आयात करणं थांबवलं आहे. त्यामुळे कोळसा उपलब्ध नसल्याने वीजननिर्मिती करणं कठीण झालं असून या सर्व गोष्टींचा परिणाम महानिर्मिती कंपनीवर झाला असल्याचं नितीन राऊत म्हणाले.

- Advertisement -

राज्याला दररोज १ हजार मेगावॅट कमी वीजपुरवठा

नितीन राऊत माध्यमांशी बोलताना सध्या विजनिर्मितीसाठी तीस टक्केच गॅसचा पुरवठा मिळत असल्याचं सांगितलं. जीएसडब्ल्यूसोबत महावितरणने २४० मेगावॅट वीज खरेदीचा करार केला आहे, मात्र, त्यांच्याकडून २ सप्टेंबरपासून विजेचा पुरवठा केला जात नसल्याचं देखील नितीन राऊत यांनी सांगितलं. सीजीपीएल आणि जीएसडब्ल्यू हे आयात केलेल्या कोळश्यापासून वीजनिर्मिती करतात. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाची किंमत वाढल्याने त्यांनी वीजनिर्मिती थांबवली आहे. जी माहिती आली आहे त्यानुसार दोन्ही प्रकल्पांमध्ये वीस दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा आहे. मात्र तरीही त्यांनी वीजनिर्मिती थांबवली आहे त्यामुळे राज्याला दररोज १ हजार मेगावॅट कमी वीजपुरवठा मिळत आहे. विजटंचाई वाढली आहे, त्यामुळे महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -