घरताज्या घडामोडीनागपुरातील शाळा २६ जानेवारीनंतर सुरू करण्याचा निर्णय, पालकमंत्री नितीन राऊतांची माहिती

नागपुरातील शाळा २६ जानेवारीनंतर सुरू करण्याचा निर्णय, पालकमंत्री नितीन राऊतांची माहिती

Subscribe

नागपुरात सध्या १७००० बेड असून यामध्ये ८ हजार ऑक्सीजन बेड आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती नितीन राऊत यांनी यावेळी दिली.

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यात अजूनही पुणे आणि नागपूरसह इतर जिल्ह्यांतील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झाला नाही. नागपूरमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय २६ जानेवारीनंतर घेणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. नितीन राऊत यांनी नागपूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्यामुळे अद्याप शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

नागपूरमधील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आढावा घेतला आहे. आढावा बैठकीनंतर नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपूरमधील कोरोना परिस्थितीची चिंताजनक असल्याने शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे. परंतु मुलांच्या लसीकरणावर भर देऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती कायम असली तरी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले आहेत. रुग्णालयातील ऑक्सीजन बेड आणि इतर बेड रिकामे नसल्यास जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात येतात परंतु सध्या आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज नाही असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

जानेवारीच्या शेवटापर्यंत रुग्ण संख्या वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या फार वाढली तर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील. नागपुरात सध्या १७००० बेड असून यामध्ये ८ हजार ऑक्सीजन बेड आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती नितीन राऊत यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : ‘कमला’ इमारत आग दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून PMNRF मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -