आंबिल ओढ्यातील कारवाई दुर्दैवी, नितीन राऊत पुणे महापौरांवर कडाडले

कारवाई होत असताना महापौर झोपले होते का?

Nitin Raut slams Pune mayor and demand take Action in Ambil odha
आंबिल ओढ्यातील कारवाई दुर्दैवी, नितीन राऊत पुणे महापौरांवर कडाडले

पुण्यातील आंबिल ओढ्यात करण्यात आलेल्या अतिक्रमणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. सोमवारी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केलं होते. आज मंगळवारी काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबिल ओढ्यातील अतिक्रमण करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांची भेट घेतली आहे. तसेच कारवाई कऱण्यात आलेल्या भागाची पाहणी केली आहे. राऊत यांनी स्थानिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तसेच पुणे महापालिकेला अशा प्रकारची कारवाई करताना लाज वाटली पाहिजे असा नितीन राऊत यांनी केला आहे.

नितीन राऊत यांनी पुण्यातील आंबिल ओढ्यातील भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आंबिल ओढ्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली ही घटना दुर्दैवी आहे या घटनेचा निषेध करतो. कोरोनाचं संकट असताना कारवाई करायला प्रशासनाला लाज वाटली पाहिजे होती. कारवाई होत असताना महापौर झोपले होते का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे. तसेच अशीच कारवाई जर नागपुरमध्ये झाली असतील तर जेसीबीखाली झोपलो असतो असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलं आहे.

आंबिल ओढ्यातील दलित समाजावर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे. माता भगिनींना ज्यांनी ज्यांनी आहात लावला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे. या घटनेची सखोच चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे.

पाडलेली घरे बांधून द्या

वंचित बहुजन विकास आघाडीकडून आंबिल ओढ्यातील कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी अतिक्रमणामध्ये पाडलेली घरे पुन्हा बांधुन द्या अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात स्थानिक महिलाही सामिल झाल्या होत्या. या महिलांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी घटनास्थळी पोबारा केला होता. सुप्रिया सुळेंनी आंदोलकांशी संवाद साधला परंतु आंदोलकांनी अजित पवार यांच्याच नावाने घोषणाबाजी केली होती. अजित पवार मुर्दाबाद अशी घोषणा महिला आंदोलकांनी दिल्या आहेत.