घरताज्या घडामोडीराहुल गांधींचा ताफा तिथे दाखल झाला आणि.., भारत जोडो यात्रेत झालेल्या दुखापतीवर...

राहुल गांधींचा ताफा तिथे दाखल झाला आणि.., भारत जोडो यात्रेत झालेल्या दुखापतीवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली असून आता ही यात्रा काही दिवसांमध्येच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. परंतु भारत जोडो यात्रेला सुरूवात झाल्यानंतर यामध्ये काँग्रेसचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील या यात्रेत सहभाग घेतला होता. परंतु यात्रेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे नितीन राऊतांना गंभीर दखापती झाली. त्यानंतर त्यांना हैदराबादमधील वासवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं होतं यावर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नितीन राऊत?

- Advertisement -

जेव्हा भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. तेव्हापासून मी यात्रेत सहभागी झालो होतो. कारण मध्यंतरीच्या काळात मी आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नव्हतो. परंतु थोडं बरं वाटल्यानंतर मला यात्रेत सहभागी व्हावं असं वाटलं. त्यामुळे मी हैदराबादला यात्रेत सहभागी व्हायला गेलो. विमानतळावर उतरल्यानंतर इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होता. त्यामुळे मी तिथे गेलो. मात्र, स्टेजच्या जवळ पोहोचल्यानंतर राहुल गांधींचा ताफा तिथे दाखल झाला. गर्दी खूप होती. त्यामुळे पोलीस अचानकपणे लोकांवर तुटून पडले. मी एका कोपऱ्यात उभा होतो. तरीदेखील येथील एसीपी आणि चार लोकांनी मला जोरात धक्का दिला. त्यामुळे माझा तोल गेला आणि मी रस्त्यावर पडलो, असं नितीन राऊत म्हणाले.

- Advertisement -

मी रस्त्यावर पडल्यानंतर माझ्या डोळ्याला जोरात मार लागला आणि तिथेच रक्तस्राव सुरू झाला. जवळपास २२ मिनिटं हा रक्तस्राव सुरू होता. पण तिथं कुणीही आलं नाही. परंतु अल्पसंख्य विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी मला सावरलं, असं नितीन राऊत म्हणाले.


हेही वाचा : हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -