Homeमहाराष्ट्रRane Vs Thackeray : उद्धव ठाकरे हे तर ओवैसीचे भाऊ, नितेश राणे...

Rane Vs Thackeray : उद्धव ठाकरे हे तर ओवैसीचे भाऊ, नितेश राणे यांनी साधला निशाणा

Subscribe

मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भावाची उपमा दिली आहे. भारतातील रोहिंगे मुसलमान आणि बांगलादेशींच्या उपस्थितीवर राणेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Nitesh Rane On Thackeray : मुंबई : मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भावाची उपमा दिली आहे. भारतातील रोहिंगे मुसलमान आणि बांगलादेशींच्या उपस्थितीवर राणेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना भारतात राहण्याची परवानगी देता कामा नये, असेही राणे म्हणाले. नितेश राणे म्हणाले की, भारतात बेकायदेशीररित्या राहात असलेले बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. समाजाचे इस्लामीकरण करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मंगल प्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांच्यासोबत अनेक भाजपा नेते मुंबईच्या भल्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. (nitish rane on rohingya muslims and bangladeshis in india reacts on waqf board)

बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी भारतात बेकायदेशीररित्या राहणे हा सुरक्षेसाठी मोठाच धोका आहे. हा आपल्या समाजाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही काळात घडलेल्या अशा घटना मुंबई तसेच देशासाठी समोर आले आहे. बेकायदेशीर प्रवाशांना भारतात राहण्याची परवानगी देता कामा नये, तर त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात पाठवायला हवे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईकरांचे प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण होणार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?

नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि मुस्लिम लीगची तुलना केली आहे. ठाकरे आणि ओवैसी हे भाऊ – भाऊ आहेत, असेही ते म्हणाले. ठाकरेंची शिवसेना ही मुस्लिम लीग प्रमाणे आहे. लीग जे सांगेल अगदी तसेच ठाकरे गट करत असतो. पण त्यांना आज कळणार नाही, तर वक्फ बोर्ड थेट मातोश्रीवर दावा सांगेल, तेव्हाच त्यांना कळेल, असा टोलाही राणे यांनी ठाकरेंना लगावला.

सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे या ड्रेस कोडच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सुळे या हिंदुत्व विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सुळे यांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. त्यामुळे या निर्णयावरची त्यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. लोकांना कट्टरपंथी बनवण्याबाबत, मशिदीत ड्रेस कोड लागू करण्याबाबत, महिलांवरील अत्याचार किंवा हिंदू महिलांचे जीवन बरबाद करण्याबाबत सुळे यांनी कधी काही प्रतिक्रिया दिली आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांना हिंदूंबद्दल द्वेष असल्याचा आरोप करतानाच सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते देखील असेच आहेत.

हेही वाचा – Live-in relationship : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांसाठी राजस्थान हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, होणार हा बदल