सोलापूर : “पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली, यांचा मला आनंद आहे आणि त्या कार्यकर्त्यावर कोणतीही कारवाई करू नका”, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असताना. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीने आरक्षणासंदर्भात निवेद देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भंडारा टाकला. ज्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा टाकला, त्याला अंगरक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली.
या प्रकारासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “भंडारा हा पवित्र मानला जातो. या पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली. यांचे मला विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते. यामुळे त्यांनी काही वावगे केले असे मला वाटत नाही. कार्यकर्त्याला मारहाण झाली, या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, “अचानक हा सर्व प्रकार झाल्यामुळे अंगरक्षक आहे ते त्यांची जबाबदारी येते. कुठलाही गुन्हा दाखल करून नका किंवा कोणतीही कारवाई करू नका, अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
हेही वाचा – धनगर आरक्षण : धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने उधळला विखे पाटलांवर भंडारा!
ठाकरेंनी 50 हजारांची घोषणा केली, त्याचे काय झाले
उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यासंदर्भात विखे पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे त्याला मंनोरंजन समजतात. यापूर्वी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये ऐकरी मदत केली पाहिजे. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. 2014 ते 2019 त्यांचे सरकार होते. त्यावेळी तुम्ही काय केले?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. पुढे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “तेव्हा तुम्हाला शेतकरी दिसला नाही. पाच वर्ष तुम्ही सत्तेत राहिलात. 50 हजार रुपये देण्याची घोषणा करत होता. विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही. विमा कंपन्याच्या कार्यालयावर मोर्चे काढले. तुम्ही अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात. मग विमा कंपन्यांवर काय कारवाई केली. उद्धव ठाकरेंच्या ज्या काही भांगडी आहेत. लोकांना त्यांची भूमिका माहिती आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा कोणी गांभीऱ्याने घेतील असे मला वाटत नाही.”