घरमहाराष्ट्रमविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?

मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची प्रत सादर केली. मात्र, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर येताच पत्रकारांनी त्यांना याबाबत छेडले.

नागपूर – सभागृहात बोलू दिलं जात नाही म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. मात्र, या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती. मविआच्या ३९ च्या आमदारांच्या या पत्रात सह्या आहेत. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. अविश्वास प्रस्तावाबाबत मला काहीच माहिती नाही, माहिती घेऊन उद्या सांगितलं जाईल, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिवांना दिले पत्र

- Advertisement -

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेले दोन-तीन दिवस कामकाज पूर्ण दिवस चालत आहे. कालही कामकाज उशीरापर्यंत चाललं. दरम्यान, विधानसभेत बोलू देत नाहीत या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची प्रत सादर केली. मात्र, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर येताच पत्रकारांनी त्यांना याबाबत छेडले.

‘मी सभागृहात होतो, मला काही माहीत नाही. मी सकाळी ९ वाजता सभागृहात गेलो होतो ते आता बाहेर आलोय. माझ्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षावर एक वर्षांपर्यंत तरी कारवाई करता येत नाही. त्यामुळे या संदर्भात मी माहिती घेऊन उद्या तुम्हाला सांगेन,’ असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं सातत्याने बोलले जात आहे. त्यातच, सभागृहात दिलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नाही. तसंच, प्रस्ताव सादर केल्याची माहितीही अजित पवारांनी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. दरम्यान, अजित पवार यावर आज काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला विधानसभेच्या सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही अध्यक्ष राहूल नार्वेकर बोलू देत नसल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात असंसदीय शब्दाचा उल्लेख केला होता. ज्यामुळे त्यांचं हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीकरिता निलंबन करण्यात आलं. तसचं विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अनेकदा अध्यक्ष बोलू देत नसल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सरकारची बाजू घेऊन सभागृह चालवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -