पुणेकरांची चिंता कायम; तर ‘या’ प्रसिद्ध परिसरात एकही रुग्ण नाही

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र, कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही. 

'या' प्रसिद्ध परिसरात एकही रुग्ण नाही

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तर कोरोनाबाधितांच्या आकडेवाडीत सर्वाधिक वाढ ही पुणे शहरात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता देखील वाढली आहे. तर, एकीकडे चिंता वाढलेली असताना देखील अतिशय गजबजलेल्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र, कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही.

हे असावे कारण?

लॉकडाऊन लागू झाल्यापासून या रेड लाईट एरिया मध्ये ग्राहकाचे येणे कमी झाले आहे. तसेच या परिसरात जाणारे सर्व रस्ते पत्रे आणि काठ्या लावून बंद करण्यात आले होते. हा संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांकडून कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनी ही वेळोवेळी येथील महिलांशी संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले. या कठीण काळात कसं जगता येईल याविषयी मार्गदर्शन केले गेले. त्यामुळेच कोरोना या भागात शिरकाव करू शकला नाही असे,म्हणे नाकारता येत नाही.

बुधवार पेठे हा परिसर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या भागात रेड लाईट एरिया असून याठिकाणी साधारण अडीच हजार महिला देहविक्री करतात. त्याचप्रमाणे याठिकाणी छोट्या आणि दाटीवाटीने घर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, या रेड लाईट एरियातील एकाही महिलेला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे उघड झाले आहे.

पुण्यात पहिल्यांदा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून येथील व्यवसाय बंद आहे. आता अनलॉक सुरु झाल्यानंतर हळूहळू ग्राहक येण्यास सुरुवात झाली आहे. हे पाहून येथील महिलांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्याजवळ असलेल्या आधीच्या पैशातून त्यांनी मास्क, सनिटायझर आणि थर्मल गन इत्यादी साहित्य खरेदी केले आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे त्याप्रमाणे थर्मलगन द्वारे तापमान तपासले जाते आणि त्यानंतर त्याला आत प्रवेश दिला जातो.

मुंबईतील उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि श्रीमंत लोकांच्या वसाहतींमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वाधिक झालेला दिसून येत आहे. मात्र, नेहमीच कुचेष्टेचा विषय असलेल्या मुंबईतील कामाठीपुरा या रेड लाईट एरियाने कोरोनावर विजय मिळवून तो ग्रीन झोन झाला आहे. या परिसरातील देहविक्री करणार्‍या महिलांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे कामाठीपुरा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. मुंबईतील वाढत्या कोरोना विषाणूच्या फैलावाला कसा आवार घालायचा, असा प्रश्न शासन आणि प्रशासनासमोर पडलेला असताना या रेडलाईट एरियातील देहविक्री करणार्‍या महिलांनी मुंबईतील सुशिक्षित समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.


हेही वाचा – Covid 19 : आतापर्यंतची सर्वात वाईट जागतिक आणीबाणी; WHO ने केली चिंता व्यक्त